Skip to main content

Posts

Showing posts from December, 2016

नाव ? कशाला हवंय...........

“नावात काय आहे ? गुलाबाला जरी दुसरे नाव असते तरी त्याचा सुगंध तसाच राहिला असता.”          अशा आशयाचे वाक्य तुम्ही ऐकले असेलच. मी काही नाटककार नाही. म्हणून जरा भाषा समजून घ्या. नाहीतर तुमच्यातला समीक्षक जागा होईल. ( काय वरवरची / उथळ भाषा वापरतो. व्हेरी चीप.) तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. हे वाक्य विल्यम शेक्सपिअरच्या रोमिओ आणि ज्यूलिअ‍ेट या प्रसिद्ध नाटकातील आहे. शेक्सपिअरच्या या नाटकाचा अनुवाद मंगेश पाडगावकर यांनी अतिशय समर्पक शब्दात केला आहे. त्यामुळे माझी वाक्यरचना थोडीशी अर्धीकच्ची वाटत असेल.          पण एखाद्याच्या नावावरून त्याच्या व्यक्तिमत्वाची आपणास खरी ओळख होते का ? माझ्या मते नाही. पण नावामुळे आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल काही प्रतिमा तयार होतात. आता उदाहरणाच्या मदतीने आपण हे समजून घेऊया. काही प्रसंगाचे वर्णन करतो. त्यातील व्यक्ति आपणास ओळखता येतात का ? ते पहा. व्यक्ति ओळखा. आता त्या व्यक्तीच्या विरुद्ध स्वभावाची पण त्याच नावाची दुसरी व्यक्ति आपणास माहीत आहे का ते पहा. पण ...