Skip to main content

Posts

Showing posts from November, 2016

स्वप्न .........

         सत्याहून वेगळी....... एका वेगळ्या जगात नेणारी....... धक्का देणारी.........मानवाला मेंदू आहे यांची जाणीव करून देणारी.......... न उलगडलेली कोडी उलगडणारी. पण स्वप्न सत्यात उतरवताना किंवा स्वप्न जगताना येणाऱ्या अडचणी या अपेक्षाभंग करणाऱ्या असतात. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी. आपल्या भोवतालच्या जगाची जाणीव करून देणारी. अशी ही स्वप्न.          स्वप्न हा वैयक्तिक अनुभव असतो. दुसऱ्याच्या दृष्टीने त्याला काडीचीही किंमत नसते. कारण ते आपण स्वतः जगत असतो. इतरांसाठी त्याचे अस्तित्व नगण्य असते. कदाचित इतरांसाठी ती चेष्टेचा विषय असतील. सतत स्वतःशी संघर्ष करायला शिकवणारे, सतत स्वतःला जाग ठेवणार, कल्पना आणि वास्तव यामध्ये अंतर दाखवणार, सतत नाविन्याचा शोध घ्यायला प्रवृत्त करणार............असच एक सुंदर स्वप्न....          एका तळ्याकाठी बसावं. एक सुंदर कविता सुचावी आणि ती लगेचच कागदावर उतरावी. पुन्हा ती कागदावर अशी उतरावी की त्याचीही एखादी कविता व्हावी. कारण एक तळ. समोर एक टेकडी. ...

(ट्रिप्लिंग)..........रांगा, नोटा आणि आपण

         रांगा आपल्याला नेहमीच्याच. देवळात दर्शनाच्या रांगा, शाळेत शिस्तीसाठी रांगा, बससाठी रांगा, मुंग्यांच्या रांगा, रेल्वे तिकीट खिडकीवरच्या रांगा, रॉकेलसाठी रांगा, रेशनसाठी रांगा आणि बँकांमधील रांगा. पण ९ नोव्हेंबर पासून या रांगांना एक अर्थ प्राप्त झाला. रांगा या मानव हा सामाजिक प्राणी आहे यांची प्रचीती देऊ लागल्या. कारण कधीही रांगेत न राहणारे आता ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत दिसू लागले आहेत.          या रांगा एका रंगमंचाप्रमाणे वाटू लागल्या आहेत. रंगमंच ? हो रंगमंच. लोकांना व्यक्त होण्यासाठी रांगा मदत करतील याचा कोणी विचारदेखील केला नसेल. लोक रांगेमध्ये आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. कारण पैसा हा आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावतो याचा अनुभव अनेकांना गेल्या आठवडाभरात आला असेलच. कारण खिशात पैसा असूनही कोणी विचारात नाही, ही भावनाच किती विचित्र आहे. कारण “पैसा बोलता है|” , पैसा फेंक तमाशा देख | किंवा दाम करी काम. असे डायलॉग आपण ऐकले असतीलच.     ...

आता तुम्ही मोठे झालात ?

           दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक कुटुंबे शहरातून गावाकडे आली असतील. पण कोकणातील चाकरमानी दिवाळीत मुंबईतच थांबण पसंत करतात. कारण मे महिन्याची सुट्टी आणि गणेश चतुर्थीला त्यातले बहुतेक जण गावी येऊन गेलेले असतात. पण तुलसी विवाह (बारस) आणि देव दिवाळी निमित्त काहीजण गावी येतात. त्या पैकी एका कुटुंबाची ही गोष्ट.       गेल्या रविवारचा दिवस. दुपारचे तीन वाजले असतील. पलीकडच्या परसातून लहान मुलांचा ओरडण्याचा, खेळण्याचा आवाज येत होता. आवाजावरून अस वाटत होत की ती मुल प्लास्टिकच्या बॉलने खेळत होती. हसणारी, बागडणारी मुल ही भूतकाळाची आठवण करून देत होती. प्लास्टिक बॉलला आम्ही कवटी बॉल म्हणायचो. आम्हाला कडक कवटी बॉल आवडायचा. आणि जर तो पायाच्या हाडावर बसला तर होणारी वेदना म्हणजे अगदी डोक्यात जायची. आम्हाला त्या बॉलच्या आवाजाची गंमत वाटायची कारण तो आवाज बहुतेक कोणाला आवडायचा नाही. असाच काही त्या मुलाचं चालू होत. आवाजावरून ती दोन तीन मुल असावीत.       पण तेवढ्यात एक कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतला....

चूक की बरोबर ?

                     गेल्या आठवड्यात अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाचा मान मिळवला. पण आता अमेरिकेत त्यांच्या निवडीस होणारा विरोध पाहता याला मान म्हणावा की अपमान म्हणावा हा खरा प्रश्न आहे. अपमान कशाचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण अमेरिका या देशाला स्वतःची अशी काही एक संस्कृती नाही आहे, अमेरिका म्हणजे अमेरिकन, युरोपियन, आशियाई, लॅटिन आणि आफ्रिकन अशा अनेक संस्कृतीचे सुंदर मिलन आहे. आणि यासाठी महत्वाचे कारण म्हणजे मुक्त आणि खुल्या विचाराचे अमेरीकन्स.           पण जग गोल आहे. याचा प्रत्यय या अध्यक्षीय निवडणुकीतून आपणास आला असेल. संपूर्ण जगात कट्टरतावादाचा पुरस्कार वाढत चालला आहे. याचेच उदाहरण म्हणून आपणास आयसिसचा उदय. ब्रिटनचा युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय. (थोडक्यात ब्रेक्झिट.) जर्मनीत निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न, काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये होणारे भारतीयांवर...

JAILBREAK OR ROOTED? BUT I HAVE A LUMIA…………….

  It’s so strange, weird statement.   It is meaningless, useless etc. Why I am think so? Because I am in a conflict. As you know these two terms are so familiar with all of you. JAILBREAK --------------- IOS (By Apple) ROOTED ------------------ ANDROID (By Google --------- By Alphabet) But what about LUMIA ……. YOU THINK WHAT RUBBISH I AM TALKING ABOUT… ??????? ------------------ WINDOWS 10 MOBILE (By Microsoft) How you think and observe things around you is more important. And how you analyse things is also important? Last week Indian army did a superb job….. Surgical Strike….. We all proud of Indian Army. Do you really think they deserve it? (Yes, Definitely. More than we expected.) Why? Most of you think why I am talking about it? Because few politician of India think that if Government will provide proof of Surgical Strike then they believe that it was happened really. They also compare it with other things happened in the past…….. (By America ….2011) I hope you under...

दिवाळी !!!

दिवाळी म्हणजे............................फराळ, फटाके, शुभेच्छा, नवीन कपडे, नवीन संकल्प हे तर आलेच. पण यारो This is 2016. या आता सर्व गोष्टींबरोबरच आता नवीन मोबाईल , नवीन गाडी , नवीन WhatsApp संदेश (घासून पुसून गुळगुळीत झालेले) (भावना महत्वाची), नवीन दागिने, नवीन फर्निचर या गोष्टींची भर झाली आहे. चकली, चिवडा, करंजी, लाडू इ. फराळाचे प्रकार आणि बरच काही. चॉकलेट, प्ले स्टेशन, एक्स बॉक्स, पर्यटन स्थळांना भेटी, खरेदी या नवीन गोष्टींची यामध्ये भर पडली आहे. सेल्फी, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम इ. वापर करणारी नवीन पिढी. दिवाळी अंक खरेदी करणारी वयोवृध्द माणस. “आमच्या वेळी अस नव्हत!!” म्हणणारे मध्यमवयी. आपको दिवाळी कि शुभकामानाये सबसे पहले हमारे चॅनेल पे म्हणणारे वृत्त निवेदक. दिवाळी फराळाच्या गडबडीत गुंतलेल्या टीव्हीवरील सासू-सुना. त्यातही मिठाचा खडा टाकणाऱ्या नंदा भावजया (टीव्हीवरील ) हिचा फराळ कसा चांगला होतो तेच बघते ( पंचलाईन.= थोडा टेन्शन तो बनता ही बॉस). दिवाळी पहाटेचा उत्साह तर निराळाच. सुगम शास्त्रीय संगीताची मेजवानी. ऑनलाईन खरेदीला आलेला महापूर. पण काहीजण वाहून गेलेले. रिटर्न ऑर्डर करणारे. बि...

खरच स्कोप नाही की होप नाही............

हल्ली विशेषतः देशप्रेम या विषयावर देशभर सांगोपांग चर्चा, वादविवाद आणि बरच काही चालू आहे. या मध्ये सोशल मिडिया आघाडीवर आहे. खरे देशप्रेमी असाल तर LIKE करा किंवा SHARE करा.......अस काही सांगणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीचा पुरावा देण्याची गरज नाही. पण हा विषय थोडा वेगळा आहे, संदर्भ वेगळा आहे. काही गोष्टी देशप्रेमाशी आपसूकच जोडलेल्या असतात त्यामध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, सैन्यदल इ. पण देशप्रेमाशी फक्त याच गोष्टी जोडलेल्या आहेत अस तुमच मत असेल तर पुन्हा एकदा विचार करा. आपण चिंतन करण्याची गरज आहे. या गोष्टी आपल्या श्वासासारख्या आहेत. (सजीवांना [to sustain] जीवनसातत्यासाठी फक्त श्वासाची गरज नसते तर इतर गोष्टीसुद्धा आवश्यक असतात. ) कारण देशप्रेमाबरोबर जबाबदारी आणि समन्वय या गोष्टी आपसूकच येतात याचे भान आपण ठेवायला हवं. आपण दररोज काय करतो, आपण दररोज कसे वागतो याच आपल्याला भान आहे का? आपण स्वतःला शिकलेले समजतो; सो कॉलड सुशिक्षित. समजावं जरूर समजावं. पण आपण कधी आत्मपरीक्षण केल आहे का? (सवाल पे सवाल. ट्विस्ट आ गया !!) कारण लोकलमध्ये, बसमध्ये मोबाईलमधली डोकी केव्हा वर होतील याचा भरवसा नाही. (...

मेरी हरी पत्ती काली हो गयी....................................

                     ५०० आणि १००० च्या नोटा काल रात्रीपासून अधिकृतरीत्या बाद ठरल्या आहेत. काळ्या पैश्यावर नियंत्रण ठेवण्यात यामुळे थोड्या प्रमाणात यश नक्कीच येईल. पण जरा थांबा................ जर तुमचा असा समाज असेल की काळा पैसा फक्त हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये साठवलेला आहे असा असेल तर तुम्ही चुकताय. लक्षात घ्या की काळा पैसा हा जमीन, सोने, टॅक्स हेवन देशांमध्ये आणि मॉरीशस मार्गे, सिंगापूर मार्गे (Double Taxation Avoidance Agreement (DTAA)) इ. अनेक मार्गाने देशात पांढरा होऊन येत आहे. पण कालच्या या निर्णयामुळे नक्कीच भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट नेते, भ्रष्ट सरकारी कर्मचारी यांनी कमावलेला काळा पैसा काही प्रमाणात व्यवहारात येईल. त्याचबरोबर दहशतवादासाठी वापरला जाणाऱ्या पैश्यांवर नियंत्रण येईल. बनावट नोटांचा धंदा बंद होईल. भारतात एकूण छपाई केल्या जाणाऱ्या नोटांपैकी ५०० आणि १००० च्या नोटांचे प्रमाण ८६ टक्के आहे. यावरून या निर्णयाचे परिमाण आपणास लक्षात घ्यावे लागतील म्हणूनच भारत सरकार आणि रिझर्व बँकेने घेतलेला हा एक धाडसी निर्णय आहे, हे आपणास...