Skip to main content

मेरी हरी पत्ती काली हो गयी....................................


                     ५०० आणि १००० च्या नोटा काल रात्रीपासून अधिकृतरीत्या बाद ठरल्या आहेत. काळ्या पैश्यावर नियंत्रण ठेवण्यात यामुळे थोड्या प्रमाणात यश नक्कीच येईल. पण जरा थांबा................ जर तुमचा असा समाज असेल की काळा पैसा फक्त हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये साठवलेला आहे असा असेल तर तुम्ही चुकताय. लक्षात घ्या की काळा पैसा हा जमीन, सोने, टॅक्स हेवन देशांमध्ये आणि मॉरीशस मार्गे, सिंगापूर मार्गे (Double Taxation Avoidance Agreement (DTAA)) इ. अनेक मार्गाने देशात पांढरा होऊन येत आहे. पण कालच्या या निर्णयामुळे नक्कीच भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट नेते, भ्रष्ट सरकारी कर्मचारी यांनी कमावलेला काळा पैसा काही प्रमाणात व्यवहारात येईल. त्याचबरोबर दहशतवादासाठी वापरला जाणाऱ्या पैश्यांवर नियंत्रण येईल. बनावट नोटांचा धंदा बंद होईल.
भारतात एकूण छपाई केल्या जाणाऱ्या नोटांपैकी ५०० आणि १००० च्या नोटांचे प्रमाण ८६ टक्के आहे. यावरून या निर्णयाचे परिमाण आपणास लक्षात घ्यावे लागतील म्हणूनच भारत सरकार आणि रिझर्व बँकेने घेतलेला हा एक धाडसी निर्णय आहे, हे आपणास मान्य करावेच लागेल. आता या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेवर होणारे परिणाम लक्षात घेतले तर थोडे दिवस आपणास त्रास सहन करावा लागणार. आता काही दिवस साध्या भाजीपाला विकत घेण्यासाठी सुध्दा ५०० आणि १००० च्या नोटा लोक बाहेर काढतील. रिक्षा आणि टॅक्सीवाले १०० आणि ५० असतील तरच बसा असं सांगतील. हॉटेलमध्ये खाण्यापूर्वी १०० आणि ५० रुपये असतील तरच ऑर्डर घेऊ अस ऐकायला मिळेल. सोन्याच्या बदल्यात सोने घ्या असही काही ऐकू येईल. रोख व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसेल. कारण काही क्विंटल धान्य किंवा भाजीपाला विकून मिळणारी रक्कम जर १००० किंवा ५०० च्या नोटांच्या रुपात असेल तर जरा अडचणीच ठरेल बहुतेक वाद्विवाद्च. कारण बहुतांश शेतकऱ्यांची बँक खाती नाहीत. आणि असली तरी त्याबद्दलचे गैरसमज.

आता महत्वाचा प्रश्न काळ्या पैश्याचं काय करायचं. तर आपल्याकडे काही पर्याय आहेत.
१. प्रामाणिकपणे बँकेत जा. १० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत पैसे बँकेमध्ये डिपॉज़िट करा. उत्पन्नाचा स्त्रोत सांगा. पॅनकार्ड नंबर सांगा. एकदम सोप्प.
२. ३० डिसेंबरनंतर ३१ मार्चपर्यंत बुद्धी झाल्यास रिझर्व्ह ठरवून दिलेल्या केंद्रावर योग्य कागदपत्रांसह पैसे जमा करा. (त्याहून सोप्प.)
३. तिरुपती बालाजी, शिर्डीला जाऊन दान करा. (पापक्षालन)
४. शेकोटी करा. (थंडी पडली आहे.)
५. गादी करा. (थंडी पडली आहे.)
६. ब्लड प्रेशर चेक करा. (कदाचित वाढला असेल.)
७. काय करणार. पैसे खा. (कारण तुम्ही जे केलय त्याला पैसे खाणे असे म्हणतात. (भ्रष्टाचारी हो शब्दाला जागा.)
आता तुम्ही प्रामाणिक असाल तर काय कराल.
१. निवांत झोपा.
२. ह्या शनिवारी (सेकण्ड सॅटरडे असला तरी) आणि रविवारी बँका चालू असतील.
३. बँक अधिकाऱ्यांशी बोला.
४. आरबीआय हेल्पलाईन नंबर - 022-22602201 आणि 022-22602944
५. उद्या किंवा परवापासून एटीएम पुन्हा सुरु होतील.
६. जर तुमच्या आईने, ताईने, आजीने खाऊच्या डब्यात, मसाल्याच्या डब्यात १००० आणि ५०० च्या नोटा ठेवल्या असतील तर ते बँकेत जमा करा.
७. पिगी बँक फोडा.
८. विद्यार्थ्यांनी कंपासपेटीखाली, जाड पुस्तकांमध्ये १००० आणि ५०० च्या नोटा ठेवल्या असतील तर बँकेत जमा करा.
आपल्या घरात काळा पैसा आहे की नाही हे कसे ओळखाल.....
असेल तर.................. (योगायोग असेल तर चिंता नको.)
१. घरात कोणी सी.ए. ला फोन करत आहे का ते बघा.
२. घरात ए.सी. मध्ये कोणाला काल घाम फुटला होता का ते आठवा.
३. काल रात्री बातम्या बघताना कोणी सरकारला शिव्या देतय का ते पहा.
४. काल रात्री किंवा आज रात्री जर निद्रानाश झाला तर.
५. घरातल्या माळ्यावरची पोती कोणी तपासत आहे काय.
६. मेरी मेहनत की कमाई ? असा डायलॉग काल घरी कोण मारत होता काय.
७. “मेरी हरी पत्ती तो काली हो गयी !” असा डायलॉग काल घरी कोण मारत होता काय.
नसेल तर.................
१. भगवान के घर देर है अंधेर नही है ! असा डायलॉग काल घरी कोण मारत होता काय.
२. काल मस्त झोप लागली तर.
३. फक्त एटीएम आणि बँक बंद असल्याच्या कारणाने झोप नाही लागली तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही सर्वसामान्य प्रामाणिक नागरिक आहात.
४. नसेल तर टेन्शनचं नाही....... कारण कशाला शोधताय.
५. व्हाट्सअप वर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेऊ नका.
६. अधिक माहितीसाठी https://www.rbi.org.in/ या लिंकवर क्लिक करा.
७. अतिउत्साही बातम्याच्या सर्जिकल स्ट्राईकवर विश्वास ठेऊ नका.
प्रामाणिकपणाची सुध्दा एक किक असते. ती प्रत्येकाला अनुभवता येत नाही. कारण ती खूप कठीण असते. पोट पाठीला चिकटल तरी प्रामाणिक असणारी माणस म्हणजे आता दुर्मिळच. काले पैसेवालो...........
तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक राहिला असतात तर निदान कालची रात्र तरी निवांत झोपला असतात.
बिच्चारे. पैसे खाण्यासाठी सरकारी नोकरी करणारे, टक्केवारीत कॅश पाहिजे अस म्हणणारे बिल्डर. हवाला रॅकेट चालवणारे, हफ्ता वसुली करणारे पोलीस, धरणातून पैसा ज्यांच्या घरी वाहतो असे राजकीय नेते आणि कंत्राटदार, खड्डे तयार करणारे कंत्राटदार, उमेदवारी विकणारे पक्षाचे प्रमुख, शिक्षण संस्थांचे दुकान मांडणारे शिक्षण सम्राट, शेतकऱ्यांचे शोषण करणारे दलाल, सावकार......................... आणि बरेच. आणि सबसे गये गुजरे.............. दहशतवादी.
काका सोनार गणेश चित्र शाळा
(जनहास्यार्थ प्रकाशित)

Comments

  1. मी मुद्रा लोन करीता अ‍ॅप्लाय केला पहिली वेळ 2600Rpay केले ना नंतर रवी पत्र मिळाले 8300 Rpay केले आता 12400r मागणी करण्यात येत आहे काय करायच

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आता तुम्ही मोठे झालात ?

           दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक कुटुंबे शहरातून गावाकडे आली असतील. पण कोकणातील चाकरमानी दिवाळीत मुंबईतच थांबण पसंत करतात. कारण मे महिन्याची सुट्टी आणि गणेश चतुर्थीला त्यातले बहुतेक जण गावी येऊन गेलेले असतात. पण तुलसी विवाह (बारस) आणि देव दिवाळी निमित्त काहीजण गावी येतात. त्या पैकी एका कुटुंबाची ही गोष्ट.       गेल्या रविवारचा दिवस. दुपारचे तीन वाजले असतील. पलीकडच्या परसातून लहान मुलांचा ओरडण्याचा, खेळण्याचा आवाज येत होता. आवाजावरून अस वाटत होत की ती मुल प्लास्टिकच्या बॉलने खेळत होती. हसणारी, बागडणारी मुल ही भूतकाळाची आठवण करून देत होती. प्लास्टिक बॉलला आम्ही कवटी बॉल म्हणायचो. आम्हाला कडक कवटी बॉल आवडायचा. आणि जर तो पायाच्या हाडावर बसला तर होणारी वेदना म्हणजे अगदी डोक्यात जायची. आम्हाला त्या बॉलच्या आवाजाची गंमत वाटायची कारण तो आवाज बहुतेक कोणाला आवडायचा नाही. असाच काही त्या मुलाचं चालू होत. आवाजावरून ती दोन तीन मुल असावीत.       पण तेवढ्यात एक कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतला....

(ट्रिप्लिंग)..........रांगा, नोटा आणि आपण

         रांगा आपल्याला नेहमीच्याच. देवळात दर्शनाच्या रांगा, शाळेत शिस्तीसाठी रांगा, बससाठी रांगा, मुंग्यांच्या रांगा, रेल्वे तिकीट खिडकीवरच्या रांगा, रॉकेलसाठी रांगा, रेशनसाठी रांगा आणि बँकांमधील रांगा. पण ९ नोव्हेंबर पासून या रांगांना एक अर्थ प्राप्त झाला. रांगा या मानव हा सामाजिक प्राणी आहे यांची प्रचीती देऊ लागल्या. कारण कधीही रांगेत न राहणारे आता ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत दिसू लागले आहेत.          या रांगा एका रंगमंचाप्रमाणे वाटू लागल्या आहेत. रंगमंच ? हो रंगमंच. लोकांना व्यक्त होण्यासाठी रांगा मदत करतील याचा कोणी विचारदेखील केला नसेल. लोक रांगेमध्ये आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. कारण पैसा हा आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावतो याचा अनुभव अनेकांना गेल्या आठवडाभरात आला असेलच. कारण खिशात पैसा असूनही कोणी विचारात नाही, ही भावनाच किती विचित्र आहे. कारण “पैसा बोलता है|” , पैसा फेंक तमाशा देख | किंवा दाम करी काम. असे डायलॉग आपण ऐकले असतीलच.     ...

चूक की बरोबर ?

                     गेल्या आठवड्यात अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाचा मान मिळवला. पण आता अमेरिकेत त्यांच्या निवडीस होणारा विरोध पाहता याला मान म्हणावा की अपमान म्हणावा हा खरा प्रश्न आहे. अपमान कशाचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण अमेरिका या देशाला स्वतःची अशी काही एक संस्कृती नाही आहे, अमेरिका म्हणजे अमेरिकन, युरोपियन, आशियाई, लॅटिन आणि आफ्रिकन अशा अनेक संस्कृतीचे सुंदर मिलन आहे. आणि यासाठी महत्वाचे कारण म्हणजे मुक्त आणि खुल्या विचाराचे अमेरीकन्स.           पण जग गोल आहे. याचा प्रत्यय या अध्यक्षीय निवडणुकीतून आपणास आला असेल. संपूर्ण जगात कट्टरतावादाचा पुरस्कार वाढत चालला आहे. याचेच उदाहरण म्हणून आपणास आयसिसचा उदय. ब्रिटनचा युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय. (थोडक्यात ब्रेक्झिट.) जर्मनीत निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न, काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये होणारे भारतीयांवर...