Skip to main content

दिवाळी !!!

दिवाळी म्हणजे............................फराळ, फटाके, शुभेच्छा, नवीन कपडे, नवीन संकल्प हे तर आलेच. पण यारो This is 2016. या आता सर्व गोष्टींबरोबरच आता नवीन मोबाईल , नवीन गाडी , नवीन WhatsApp संदेश (घासून पुसून गुळगुळीत झालेले) (भावना महत्वाची), नवीन दागिने, नवीन फर्निचर या गोष्टींची भर झाली आहे. चकली, चिवडा, करंजी, लाडू इ. फराळाचे प्रकार आणि बरच काही. चॉकलेट, प्ले स्टेशन, एक्स बॉक्स, पर्यटन स्थळांना भेटी, खरेदी या नवीन गोष्टींची यामध्ये भर पडली आहे.
सेल्फी, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम इ. वापर करणारी नवीन पिढी. दिवाळी अंक खरेदी करणारी वयोवृध्द माणस. “आमच्या वेळी अस नव्हत!!” म्हणणारे मध्यमवयी. आपको दिवाळी कि शुभकामानाये सबसे पहले हमारे चॅनेल पे म्हणणारे वृत्त निवेदक. दिवाळी फराळाच्या गडबडीत गुंतलेल्या टीव्हीवरील सासू-सुना. त्यातही मिठाचा खडा टाकणाऱ्या नंदा भावजया (टीव्हीवरील ) हिचा फराळ कसा चांगला होतो तेच बघते ( पंचलाईन.= थोडा टेन्शन तो बनता ही बॉस).
दिवाळी पहाटेचा उत्साह तर निराळाच. सुगम शास्त्रीय संगीताची मेजवानी. ऑनलाईन खरेदीला आलेला महापूर. पण काहीजण वाहून गेलेले. रिटर्न ऑर्डर करणारे. बिघाड झालेले मोबाईल हातात घेऊन हिरमोड झालेले. असेही काही........ चकलीच योग्य प्रमाण फोनवर विचारणाऱ्या काकू, नव्या सुना तर तुमच्या आजूबाजूला असतीलच. अनारसे ARE TRENDING (#अनारसे on ………www.फराळाचा बट्ट्याबोळ.com). रुसवे- फुगवे म्हणजे सणासुदीचा स्पेशल बोनस. काय बुवा आमच्याकडे आला नाहीत. बघ तरी एक शुभेच्छेचा एक मेसेज करायला हरकत नव्हती. कंदीलाची तर बातच निराळी. बिचारा खूप घासाघीस करून घेतलेला पण शेजाऱ्यांना जरा महागडा करून सांगितलेला असा तो.
रांगोळी म्हणजे सुप्त गुणांना वाव देणारे क्षेत्र. आई, ताई, आजी यांच्या वेगवेगळ्या शैल्या. काही पारंपारिक, काही संस्कार, काही ठिपक्यांच्या तर काही रेडीमेड. पण मजा तर येतेच. रांगोळी काढायला आणि पाहायला. नवीन आयडिया वर्क होतात का? हे पाहता येत. पणत्यांची आरास सौंदर्यात अधिक भर घालते. पण तेल पणतीबाहेर कस येत हा सकाळी पडलेला प्रश्न (उत्तर माहित असूनही.) वात जळाली तर .......वात विझली तर अशा उगाच चिंता. (दिया बुझना नही चाहिये, अपशकून होता है | डेलीसोपचा साईडइफेक्ट.) आणि थोडासा इमोशनल मुद्दा म्हणजे............फटाके.
दिवाळी म्हणजे फटाके तर हवेच. हे प्रदूषण वैगेरे अंधश्रद्धा असतात. एक दिन तो बजानाइच मंगता है ! बोले तो............. फुलबाजा, पाऊस, भुईचक्र, टिकल्या, नागगोळी वेगेरे वेगेरे बच्चे लोग के लिये, अपुन को तो बस आयटम बॉम्ब.... बोले तो सुतळी , हज्जार का माळ थोडा थोडा..... कभी कभी..... लेकीन हर बार. रात्री उशिरा लावलेल्या फटाक्यांची मजा तर निराळीच. शिव्या, शाप आणि बरच काही.
इको फ्रेंडली फटाके......(t&c- आधी वाजवून बघा.)
दिवाळीला प्रदर्शित होणारे चित्रपट म्हणजे टिपिकल ड्रामा असलेला. लव स्टोरी, इमोशनल, प्रेमाचा त्रिकोण असेल तर बर होईल. साथीला हनी सिंग नाहीतर तो रे आपला तो ........हा बादशाह आहे. एक रॅपसॉंग तर पाहिजे. त्या चित्रपटांचे रिव्ह्यू देणारे समीक्षक (म्हणाव का ?) स्टारच्या मागे लागलेले. (*****) परदेशी लोकेशनवर शूट, ड्रोन शॉट, सिजीआय, वाद..........विवाद (पब्लिसिटी स्टंट) आणि बरच काही. दिवाळी म्हणजे काय रे भावा.
भाऊबीज आहे. बहिणीला गिफ्ट द्यायला ऑप्शन शोधताय तर मग ह्या दिवाळीला एक मस्त फोन आलाय जो आपल दिवाळ नक्की काढेल. आयफोन सेव्हन. फक्त ६२००० रुपये मात्र /- बिग डिस्काउंट थिस दिवाली २००० रुपये माफ. आणि गम्मत बघा वॉटरप्रूफ आहे पण पाण्यात पडून बिघडला तर मात्र वॉरंटी नाही. चेष्टा करता का भाऊ. बहिणीला सांगा कि भावनाओंको समझो. अशी ही दिवाळी. थोडीशी खट्टी ....... थोडीशी मिठी. प्रॉब्लेम कधीच आपली पाठ सोडत नाहीत पण आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन महत्वाचा आहे.
काका सोनार गणेश चित्र शाळा (दिवाळी – २०१६)

Comments

Popular posts from this blog

आता तुम्ही मोठे झालात ?

           दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक कुटुंबे शहरातून गावाकडे आली असतील. पण कोकणातील चाकरमानी दिवाळीत मुंबईतच थांबण पसंत करतात. कारण मे महिन्याची सुट्टी आणि गणेश चतुर्थीला त्यातले बहुतेक जण गावी येऊन गेलेले असतात. पण तुलसी विवाह (बारस) आणि देव दिवाळी निमित्त काहीजण गावी येतात. त्या पैकी एका कुटुंबाची ही गोष्ट.       गेल्या रविवारचा दिवस. दुपारचे तीन वाजले असतील. पलीकडच्या परसातून लहान मुलांचा ओरडण्याचा, खेळण्याचा आवाज येत होता. आवाजावरून अस वाटत होत की ती मुल प्लास्टिकच्या बॉलने खेळत होती. हसणारी, बागडणारी मुल ही भूतकाळाची आठवण करून देत होती. प्लास्टिक बॉलला आम्ही कवटी बॉल म्हणायचो. आम्हाला कडक कवटी बॉल आवडायचा. आणि जर तो पायाच्या हाडावर बसला तर होणारी वेदना म्हणजे अगदी डोक्यात जायची. आम्हाला त्या बॉलच्या आवाजाची गंमत वाटायची कारण तो आवाज बहुतेक कोणाला आवडायचा नाही. असाच काही त्या मुलाचं चालू होत. आवाजावरून ती दोन तीन मुल असावीत.       पण तेवढ्यात एक कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतला....

(ट्रिप्लिंग)..........रांगा, नोटा आणि आपण

         रांगा आपल्याला नेहमीच्याच. देवळात दर्शनाच्या रांगा, शाळेत शिस्तीसाठी रांगा, बससाठी रांगा, मुंग्यांच्या रांगा, रेल्वे तिकीट खिडकीवरच्या रांगा, रॉकेलसाठी रांगा, रेशनसाठी रांगा आणि बँकांमधील रांगा. पण ९ नोव्हेंबर पासून या रांगांना एक अर्थ प्राप्त झाला. रांगा या मानव हा सामाजिक प्राणी आहे यांची प्रचीती देऊ लागल्या. कारण कधीही रांगेत न राहणारे आता ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत दिसू लागले आहेत.          या रांगा एका रंगमंचाप्रमाणे वाटू लागल्या आहेत. रंगमंच ? हो रंगमंच. लोकांना व्यक्त होण्यासाठी रांगा मदत करतील याचा कोणी विचारदेखील केला नसेल. लोक रांगेमध्ये आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. कारण पैसा हा आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावतो याचा अनुभव अनेकांना गेल्या आठवडाभरात आला असेलच. कारण खिशात पैसा असूनही कोणी विचारात नाही, ही भावनाच किती विचित्र आहे. कारण “पैसा बोलता है|” , पैसा फेंक तमाशा देख | किंवा दाम करी काम. असे डायलॉग आपण ऐकले असतीलच.     ...

चूक की बरोबर ?

                     गेल्या आठवड्यात अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाचा मान मिळवला. पण आता अमेरिकेत त्यांच्या निवडीस होणारा विरोध पाहता याला मान म्हणावा की अपमान म्हणावा हा खरा प्रश्न आहे. अपमान कशाचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण अमेरिका या देशाला स्वतःची अशी काही एक संस्कृती नाही आहे, अमेरिका म्हणजे अमेरिकन, युरोपियन, आशियाई, लॅटिन आणि आफ्रिकन अशा अनेक संस्कृतीचे सुंदर मिलन आहे. आणि यासाठी महत्वाचे कारण म्हणजे मुक्त आणि खुल्या विचाराचे अमेरीकन्स.           पण जग गोल आहे. याचा प्रत्यय या अध्यक्षीय निवडणुकीतून आपणास आला असेल. संपूर्ण जगात कट्टरतावादाचा पुरस्कार वाढत चालला आहे. याचेच उदाहरण म्हणून आपणास आयसिसचा उदय. ब्रिटनचा युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय. (थोडक्यात ब्रेक्झिट.) जर्मनीत निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न, काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये होणारे भारतीयांवर...