Skip to main content

खरच स्कोप नाही की होप नाही............

हल्ली विशेषतः देशप्रेम या विषयावर देशभर सांगोपांग चर्चा, वादविवाद आणि बरच काही चालू आहे. या मध्ये सोशल मिडिया आघाडीवर आहे. खरे देशप्रेमी असाल तर LIKE करा किंवा SHARE करा.......अस काही सांगणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीचा पुरावा देण्याची गरज नाही. पण हा विषय थोडा वेगळा आहे, संदर्भ वेगळा आहे. काही गोष्टी देशप्रेमाशी आपसूकच जोडलेल्या असतात त्यामध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, सैन्यदल इ.
पण देशप्रेमाशी फक्त याच गोष्टी जोडलेल्या आहेत अस तुमच मत असेल तर पुन्हा एकदा विचार करा. आपण चिंतन करण्याची गरज आहे. या गोष्टी आपल्या श्वासासारख्या आहेत.
(सजीवांना [to sustain] जीवनसातत्यासाठी फक्त श्वासाची गरज नसते तर इतर गोष्टीसुद्धा आवश्यक असतात. ) कारण देशप्रेमाबरोबर जबाबदारी आणि समन्वय या गोष्टी आपसूकच येतात याचे भान आपण ठेवायला हवं.
आपण दररोज काय करतो, आपण दररोज कसे वागतो याच आपल्याला भान आहे का? आपण स्वतःला शिकलेले समजतो; सो कॉलड सुशिक्षित. समजावं जरूर समजावं. पण आपण कधी आत्मपरीक्षण केल आहे का? (सवाल पे सवाल. ट्विस्ट आ गया !!)
कारण लोकलमध्ये, बसमध्ये मोबाईलमधली डोकी केव्हा वर होतील याचा भरवसा नाही. (मोबाईल के बाहर भी दुनिया है !) HEADS ARE HACKED BY THE MOBILES. आपल्या आजूबाजूला माणस आहेत? PEOPLES ARE JUDGED BY THEIR MOBILE BRAND. (BEWARE OF CLONES.) दिसत तस नसत म्हणून ...... ........त.
कचरा कचराकुंडीत टाकायचा म्हणजे POKEMON GO मध्ये POKEMON शोधल्यासारख समजून टाका. (शोधायचं काय ते सांग..........अरे कचराकुंडी) मग येईल न गम्मत कचरासुद्धा कचराकुंडीत टाकण्याची. पण तो गेम नाही, त्याला लेवल नाही. पुन्हा स्कोर सोशल मिडीयावर शेयर करता येत नाही. म्हणून, नाहीतर आम्ही नक्की टाकला असता.
ट्राफिक म्हणजे जाम वैताग. म्हणून मी फोर व्हीलर घेत नाही. अशी वाक्य तुम्ही ऐकली असतीलच.
पण शेजारच्या अंकलने नवीन कार घेतली.
काय ?
ह्या पाडव्याला काय म्हणतोस?
घेऊया का?
ट्राफिक बरोबर मॅनेज होईल, फक्त तू चालवणार आहेस का? सांग..........
असे हे हवेहवेसे वैताग.
कशासाठी स्टेटससाठी. SUV कशी वाटते रे.
(हो, हो डीझेल पिणारी घेऊया.. ..)
सणासुदीला नसती अवदसा !! समजल का ?
बरोबर...... लाऊडस्पीकर.
घरात ७.१, ५.१ होम थिएटर घ्यायचा.
वर्षभर घरातल्यांच्या डोक्याला ताप.
काही बाप म्हणजे................................................ बाप रे बाप. नसता थरकाप. (बाप को बेटे से जादा बेस पसंद है |)
चतुर्थी म्हणू नका, दिवाळी म्हणू नका की आता तर पितृ पक्षात सुध्दा लाऊडस्पीकर लावला जातो. कहर......... आज का दिन हमारा दिन, एक दिन तो एन्जॉय बनता है | अरे जर हररोज किसी का दिन येत राहिला तर हम क्या करे | कान मे कापसाचे बोळे घालून बसाव लागेल.
डीजे की तो बात मत करना !! ........................................................ शांतता ( बहिरा झाला वाटत.)
आजकाल युज अँड थ्रो चा जमाना समजला जातो. सण, समारंभ, सोहळे, मेळावे अशा ठिकाणी अशा गोष्टींचा ढीग (प्लास्टिक ग्लास, प्लेट्स इ.) तुम्ही पाहिला असेलच. अशा कार्यक्रमात आपले भान जरा सुटतेच. कारण आपला लुक, नवीन कपडे, नवीन शूज इ. आपणास अधिक महत्वाचे वाटतात. वाटायलाच हवे. (After All they are yours.) पण आपल्या आजूबाजूला असलेल्या परिसरात कचरा होणार नाही यांची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. कारण सर्व गोष्टी पैश्यात मोजता येत नाही आणि समाधानाच काय. कसलं समाधान ? उत्तर देत नाही. स्वतः स्वच्छता करा उत्तर आपोआपच मिळेल. निदान आयोजकांना जेवणातल्या मेनुबद्दल ढीगभर सुचना देण्याबरोबर स्वच्छतेबद्दलसुध्दा सुचना द्या.
आज जरा खूप जास्तच झाल. आता थांबतो. पण याचा आणि देशप्रेमाचा संबंध काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. देशप्रेम हे एक निम्मित आहे. प्रश्न आपण २०१६ मध्ये खरोखरच स्वातंत्र्य म्हणजे काय ? याचे उत्तर शोधले आहे का हा आहे. जात, धर्म, पंथ, लिंग, वंश, भाषा, प्रदेश इ.मध्ये आपण स्वतःला अडकवून ठेवले आहे. देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक गोष्टीवर चर्चा करण्यापेक्षा आजचा तरुण वरीलपैकी बंधनांवर दुराभिमान बाळगून आहेत. (Not all.) आपण आपल्या आईवडिलांवर प्रेम करतो पण आपणास यशस्वी होण्यासाठी फक्त आई वडिलांवरील प्रेम मदत करू शकत नाही. आणि आपण आपल्या आई वडिलांवर प्रेम करतो हे प्रत्येकवेळी सिद्ध करण्याची गरज नाही. प्रेम हे कधी कट्टरतेत परावर्तीत होत कामा नये. तसेच देशाचे आहे.
आपल्या आजच्या चांगल्या सवयी................... भले त्या आज चेष्टेचा विषय ठरतील पण नक्की बदल घडून आणतील. आजूबाजूच्या जगात काय चालू आहे याचे भान आपणास हवे. सतत नवीन शिकण्याची भूक आपल्यामध्ये हवी. पण एक समाज म्हणून आपण खरोखरच प्रगल्भ झालो आहोत का ? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
आता ह्या खटाटोपाचं मुख्य कारण......
गेल्या आठवड्यात ग्लोबल यूथ डेवेलपमेंट इंडेक्सचा अहवाल प्रकाशित झाला. यामध्ये भारताचा १७० देशांमध्ये १३३वा क्रमांक आहे. हा नक्कीच निराशजनक आहे. हा अहवाल कॉमनवेल्थ सेक्रेटरीएटने प्रकाशित केला आहे.
http://youthdevelopmentindex.org/ ] यामध्ये राजकीय सहभाग, आरोग्य आणि कल्याण, रोजगार आणि संधी, शिक्षण आणि नागरी सहभाग असे निकष विचारात घेण्यात आले आहेत. यासाठी प्रत्येक देशातील १५ ते २९ वयोगटातील तरुणांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षात भारताच्या क्रमांकात नक्कीच वाढ झाली आहे पण त्याचा वेग अतिशय कमी आहे. यासाठी तरुणानी स्वतः सरकारवर सुधारणांसाठी दबाव आणला पाहिजे.
कारण “इंडिया का कुछ नाही हो सकता |” असे खासगीत म्हणून ‘इंडिया इज द बेस्ट’ स्टेटस ठेवणारे कधी देशाच उज्वल भविष्य घडवू शकत नाही.
“सिर्फ स्टेटस से कुछ नही होगा सोच बदलनी चाहिये |”
नाहीतर भारतात काही स्कोप नाही की भारतात काही होप नाही अस म्हणत.................पासपोर्ट ऑफिसची वाट धराल.
काका सोनार गणेश चित्र शाळा

Comments

Popular posts from this blog

आता तुम्ही मोठे झालात ?

           दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक कुटुंबे शहरातून गावाकडे आली असतील. पण कोकणातील चाकरमानी दिवाळीत मुंबईतच थांबण पसंत करतात. कारण मे महिन्याची सुट्टी आणि गणेश चतुर्थीला त्यातले बहुतेक जण गावी येऊन गेलेले असतात. पण तुलसी विवाह (बारस) आणि देव दिवाळी निमित्त काहीजण गावी येतात. त्या पैकी एका कुटुंबाची ही गोष्ट.       गेल्या रविवारचा दिवस. दुपारचे तीन वाजले असतील. पलीकडच्या परसातून लहान मुलांचा ओरडण्याचा, खेळण्याचा आवाज येत होता. आवाजावरून अस वाटत होत की ती मुल प्लास्टिकच्या बॉलने खेळत होती. हसणारी, बागडणारी मुल ही भूतकाळाची आठवण करून देत होती. प्लास्टिक बॉलला आम्ही कवटी बॉल म्हणायचो. आम्हाला कडक कवटी बॉल आवडायचा. आणि जर तो पायाच्या हाडावर बसला तर होणारी वेदना म्हणजे अगदी डोक्यात जायची. आम्हाला त्या बॉलच्या आवाजाची गंमत वाटायची कारण तो आवाज बहुतेक कोणाला आवडायचा नाही. असाच काही त्या मुलाचं चालू होत. आवाजावरून ती दोन तीन मुल असावीत.       पण तेवढ्यात एक कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतला....

(ट्रिप्लिंग)..........रांगा, नोटा आणि आपण

         रांगा आपल्याला नेहमीच्याच. देवळात दर्शनाच्या रांगा, शाळेत शिस्तीसाठी रांगा, बससाठी रांगा, मुंग्यांच्या रांगा, रेल्वे तिकीट खिडकीवरच्या रांगा, रॉकेलसाठी रांगा, रेशनसाठी रांगा आणि बँकांमधील रांगा. पण ९ नोव्हेंबर पासून या रांगांना एक अर्थ प्राप्त झाला. रांगा या मानव हा सामाजिक प्राणी आहे यांची प्रचीती देऊ लागल्या. कारण कधीही रांगेत न राहणारे आता ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत दिसू लागले आहेत.          या रांगा एका रंगमंचाप्रमाणे वाटू लागल्या आहेत. रंगमंच ? हो रंगमंच. लोकांना व्यक्त होण्यासाठी रांगा मदत करतील याचा कोणी विचारदेखील केला नसेल. लोक रांगेमध्ये आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. कारण पैसा हा आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावतो याचा अनुभव अनेकांना गेल्या आठवडाभरात आला असेलच. कारण खिशात पैसा असूनही कोणी विचारात नाही, ही भावनाच किती विचित्र आहे. कारण “पैसा बोलता है|” , पैसा फेंक तमाशा देख | किंवा दाम करी काम. असे डायलॉग आपण ऐकले असतीलच.     ...

चूक की बरोबर ?

                     गेल्या आठवड्यात अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाचा मान मिळवला. पण आता अमेरिकेत त्यांच्या निवडीस होणारा विरोध पाहता याला मान म्हणावा की अपमान म्हणावा हा खरा प्रश्न आहे. अपमान कशाचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण अमेरिका या देशाला स्वतःची अशी काही एक संस्कृती नाही आहे, अमेरिका म्हणजे अमेरिकन, युरोपियन, आशियाई, लॅटिन आणि आफ्रिकन अशा अनेक संस्कृतीचे सुंदर मिलन आहे. आणि यासाठी महत्वाचे कारण म्हणजे मुक्त आणि खुल्या विचाराचे अमेरीकन्स.           पण जग गोल आहे. याचा प्रत्यय या अध्यक्षीय निवडणुकीतून आपणास आला असेल. संपूर्ण जगात कट्टरतावादाचा पुरस्कार वाढत चालला आहे. याचेच उदाहरण म्हणून आपणास आयसिसचा उदय. ब्रिटनचा युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय. (थोडक्यात ब्रेक्झिट.) जर्मनीत निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न, काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये होणारे भारतीयांवर...