Skip to main content

Posts

Showing posts from 2017

We are changing.

                                      बदल ही काळाची गरज आहे.आम्ही सुध्दा बदलत आहोत. नाविन्याचा ध्यास हा नेहमी चांगल्या आणि दर्जेदार कामासाठी प्रेरणा देतअसतो. येत्या आठवड्यात नवीन रुपात आणि नवीन संकेतस्थळावर तुम्हाला ह्या ब्लॉगवरील सर्व लेख वाचता येतील. तुम्हाला एक नवा आणि ताजा अनुभव मिळेल अशी मी आशा करतो. नवीन रूप नवीन विचारांना आकार देईल. ह्या ब्लॉगवर प्रकाशित होणाऱ्या लेखांची संख्या अतिशय कमी आहे. पण आम्ही तुम्हाला दर्जेदार आणि सकस विचार देण्याचा प्रयत्न नक्की करू. तुमचा पाठींबा आम्हाला नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देत असतो. आपणास जर एखादा लेख आवडला तर जरूर शेअर करा, आमच्याशी तुमचे विचार शेअर करा. व्यक्त व्हा. कारण एखादे माध्यम जर आपणास संधी देत असेल तर आपण त्या संधीचा नक्की फायदा उठवला पाहिजे. तुम्हाला काही सुधारणा सुचवायच्या असतील आम्हाला तुम्ही सुचऊ शकता. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा हटके दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. कारण आपल्या दररोजच्या कामाच्या व्यापात आपण स्वतःला क...

सस्ती सोच के मारे........

             आपण दैनंदिन जीवनात अनेक अनुभव घेत असतो. काही अनुभव दृश्य असतात म्हणजेच दिसणारे. काही अनुभव श्राव्य असतात म्हणजेच ऐकू येणारे. तर काही दृक-श्राव्य असतात म्हणजेच दिसणारे तसेच ऐकू येणारे. या सर्वामध्ये दृक-श्राव्य अनुभव हा दीर्घकाळ टिकतो. कारण आपण अशा अनुभवांमध्ये दृश्य आणि ध्वनी यामध्ये सहसंबंध जोडू शकतो. ह्या अनुभवांचा आपल्यावर खोलवर परिणाम होतो. असे परिणाम अतिशय प्रभावीपणे देण्याचे माध्यम म्हणजे दूरदर्शन. आता यामध्ये नवीन माध्यमाची भर पडली आहे. ते माध्यम म्हणजे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे माहितीचा विस्फोट. असंख्य माहितीची खाण. अशी खाण जी आपणास दृक, श्राव्य आणि दृक-श्राव्य अनुभव देते. पण आता आपण जे पाहतो, ऐकतो ते सत्य आहे का ? हा विचार करण्याची वेळ आता आली आहे.            इंटरनेट हे मनोरंजनाचे एक प्रभावी साधन आहे. इन्टरनेटमुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपणास नवीन नवीन गोष्टी शिकता येतात. दिवसभराच्या दगदगीनंतर थोडा निवांत वेळ आपण इंटरनेट सोबत घालवतो. या माध्यमाचा आपल्या मतमतांतरावर परिणाम होतो...

एक अशी ती .. ..

एक अशी ती .. .. पहिली घटना. दिनांक – २० जानेवारी २०१७ स्थळ – व्हाईट हाउस, वॉशिंग्टन डी. सी.        काहीवेळा असं वाटत की वेळ थांबावी. किंवा भूतकाळातील काही चुका पुन्हा दुरुस्त कराव्यात. पण ते शक्य आहे का ? नाही. पण हिंदी चित्रपटात देखील एक प्रसिद्ध संवाद आहे. “ जो कुछ होता है अच्छे के लिये होता है | ” तेव्हा आशा करूया. जगभरातील बुद्धीजीवी लोकांच्या मनात असेच काहीसे विचार येत असतील. कारण आज डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. ९ नोव्हेंबर २०१६ नंतर त्यांची काही वक्तव्ये काळजाचा ठोका चुकावणारीच होती. राजकारणाची काहीही पार्श्वभूमी नसणारा एक व्यक्ति जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतो तेव्हा काही क्षण अस वाटत की बघा भारतात अस नाही. भारतात कशी घराणेशाही, भ्रष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, एकमेकावर चिखलफेक करणारे आणि पक्षांतर केल्यावर स्तुती करणारे नेते, राजकारणी आणि बिल्डर लॉबी यांचे संगनमत, एकाच रस्त्याचे दहा दहा वेळा कंत्राट मिळणारे कंत्राटदार आणि असा बराच गोंधळ आहे. अमेरिकेतही थोड्याफार फरकाने असेच आहे पण आपली ...

शोध आनंदाचा

        शोध. घेत आहे. घेत राहणार. घेईन. घ्यालला हवा. घेणार आहे. घेणार कोण ? कशाला घ्यायचा ? प्रत्येकजण कशाचा तरी शोध घेतच असतो. प्रत्येकजण काहीतरी शोधतच असतो. तसा शोध हा शब्द आपल्यापासून कोसो दूर आहे अस वाटणारे अनेकजण आपल्या आजूबाजूला असतील. शोध म्हणजे काय रे भाऊ....? अस म्हणणारे देखील अनेक जण आपल्या आजूबाजूला असतील.         शोध या शब्दाशी आपली ओळख शाळेतच झाली असेल. त्याआधी आपण लपाछपीचा खेळ खेळून आपण शोध घेताच होतो. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ? वाफेचे इंजिन कोणी शोधून काढले ? टेलीफोनचा शोध कोणी लावला ? अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ? गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला ? अग्नीचा शोध, चाकाचा शोध अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्ही शाळेत दिली असतीलच. मुद्दामच या प्रश्नांची यादी दिली आहे कारण तुम्हाला भूतकाळाची आठवण व्हावी हेच प्रयोजन.         शोध आपली पाठ काही सोडत नाही. अगदी अकरावीच्या प्रवेशासाठी चांगल्या कॉलेजचा शोध. पुन्हा चागंल्या कॉलेजची व्याख्या काय हे आपल्या सोयीनुसारच ठरवलं जात. क्...

तुमच्यातही एक कलाकार ...

            आळस, कंटाळा .........सर्वांनाच येतो. तुम्हाला येतो का ? येत असणारच. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येतो ? तुम्ही आळशी आहात का ? किंवा तुम्ही एखाद्या कामाचा आळस करता का ? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडत असतील किंवा कोणाला तरी विचारावे असे वाटत असेल. आळस, कंटाळा काहीही म्हणा प्रत्येकाला येत असतोच. पण तो कधी येतो ? किती येतो ? आणि का येतो ? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? आणि तो येऊ नये यासाठी तुम्ही काय करता ? आणि या बद्दल सल्ले, सुचना आणि उपदेश असे बरेच काही तुम्ही ऐकत असाल.            एक अशी गोष्ट तिला आपण नेहमीच बाजूला ठेवतो. एक अशी गोष्ट जी आपल्या खूप जवळ असते पण तरीही ती आपणास उमगत नाही. किंवा त्याची जाणीव होत नाही. अशी ही कोणती गोष्ट आहे ? लक्षात येतंय का ? होय अगदी बरोबर. आपली आवड. आपल्या आवडीचे काम जर आपणास करायला मिळाले तर आपण ते काम आपण न कंटाळता करू शकतो. ते काम कोणतेही असू शकते. त्यासाठी कशाचेही बंधन बाळगण्याचे कारण नाही. कारण आपण अनेकदा स्वतः भोवती एक चौकट निर्माण करतो आणि त्य...