आपण दैनंदिन जीवनात अनेक अनुभव घेत असतो. काही अनुभव दृश्य असतात म्हणजेच दिसणारे. काही अनुभव श्राव्य असतात म्हणजेच ऐकू येणारे. तर काही दृक-श्राव्य असतात म्हणजेच दिसणारे तसेच ऐकू येणारे. या सर्वामध्ये दृक-श्राव्य अनुभव हा दीर्घकाळ टिकतो. कारण आपण अशा अनुभवांमध्ये दृश्य आणि ध्वनी यामध्ये सहसंबंध जोडू शकतो. ह्या अनुभवांचा आपल्यावर खोलवर परिणाम होतो. असे परिणाम अतिशय प्रभावीपणे देण्याचे माध्यम म्हणजे दूरदर्शन. आता यामध्ये नवीन माध्यमाची भर पडली आहे. ते माध्यम म्हणजे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे माहितीचा विस्फोट. असंख्य माहितीची खाण. अशी खाण जी आपणास दृक, श्राव्य आणि दृक-श्राव्य अनुभव देते. पण आता आपण जे पाहतो, ऐकतो ते सत्य आहे का ? हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. इंटरनेट हे मनोरंजनाचे एक प्रभावी साधन आहे. इन्टरनेटमुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपणास नवीन नवीन गोष्टी शिकता येतात. दिवसभराच्या दगदगीनंतर थोडा निवांत वेळ आपण इंटरनेट सोबत घालवतो. या माध्यमाचा आपल्या मतमतांतरावर परिणाम होतो...
Learn from yesterday, Live for today, Hope for tomorrow.