Skip to main content

एक अशी ती .. ..

एक अशी ती .. ..
पहिली घटना.

दिनांक – २० जानेवारी २०१७

स्थळ – व्हाईट हाउस, वॉशिंग्टन डी. सी.

       काहीवेळा असं वाटत की वेळ थांबावी. किंवा भूतकाळातील काही चुका पुन्हा दुरुस्त कराव्यात. पण ते शक्य आहे का ? नाही. पण हिंदी चित्रपटात देखील एक प्रसिद्ध संवाद आहे. “ जो कुछ होता है अच्छे के लिये होता है | ” तेव्हा आशा करूया. जगभरातील बुद्धीजीवी लोकांच्या मनात असेच काहीसे विचार येत असतील. कारण आज डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. ९ नोव्हेंबर २०१६ नंतर त्यांची काही वक्तव्ये काळजाचा ठोका चुकावणारीच होती. राजकारणाची काहीही पार्श्वभूमी नसणारा एक व्यक्ति जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतो तेव्हा काही क्षण अस वाटत की बघा भारतात अस नाही. भारतात कशी घराणेशाही, भ्रष्टाचार, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, एकमेकावर चिखलफेक करणारे आणि पक्षांतर केल्यावर स्तुती करणारे नेते, राजकारणी आणि बिल्डर लॉबी यांचे संगनमत, एकाच रस्त्याचे दहा दहा वेळा कंत्राट मिळणारे कंत्राटदार आणि असा बराच गोंधळ आहे. अमेरिकेतही थोड्याफार फरकाने असेच आहे पण आपली बेशिस्तीपण विकसनशील आहे. आणि या सर्वाला जोडून येणारा अजून एक शब्द तो म्हणजे पक्षाची संस्कृती. आमच्या पक्षाच्या संस्कृतीत हे बसत नाही. ते बसत नाही. आमच्या पक्षाला एवढी वर्ष झाली. आमचा पक्ष कधी तत्वाची तडजोड करत नाही. तुमच्या फक्त आदेशाची वाट बघतो आहे अस म्हणणारे कार्यकर्ते.

     या सर्वामध्ये एक शब्द नेहमी विचार करायला लावतो. तो म्हणजे संस्कृती. आपण कशाला संस्कृती म्हणतो. बंधनांना. दुभंगलेपणाला. कारण जेव्हा संस्कृतीच्या नावावर आपण आपली फसवणूक करू लागतो. तेव्हा आपण आपलेच नुकसान करून घेतो. आपण इतिहासात रममाण होतो आणि वर्तमान विसरतो. भारतात राष्ट्रीय प्रश्नांवर खुलेपणाने बोलणारे, राजकीय मते असणारे सेलेब्रिटी अगदी हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे आहेत. आणि जरी कोणी बोलले तरी त्याला बोल लावण्यात काही आपण मागे नाही. आपल्या राजकीय संस्कृतीतले सो कॉलड कार्यकर्ते, प्रवक्ते लगेचच पुतळा जाळ कार्यक्रम, अंत्यविधी, घरासमोर घोषणा, काळे झेंडे दाखवणे अस बरेच काही कार्यक्रम सुरु करतो. आणि या सर्वांना लोकशाही मार्गाने निषेध, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते. बाकी तुम्हाला आता सवय झाली आहेच. कारण तो त्यांना आपल्या नेत्याचा अपमान वाटू लागतो. पण अरे मूर्खांनो, आपण सूर्यावर थुंकलो म्हणून सूर्य थोडेच विझणार आहे. तसच तुमच्या सो कॉलड महान नेत्यावर कोणी जर टीका केली तर त्याची महानता थोडेच कमी होणार आहे. अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायिका, खेळाडू आणि कलाकार यांना देखील राजकीय मते असू शकतात हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आपल्या मते त्याचं ते काम नाही. आणि तीव्र राजकीय मते असूनदेखील मुग गिळून शांत बसणारे कलाकार हे सांस्कृतिक ऱ्हासाचे प्रतीक आहे. कारण कला म्हणजे व्यक्त होणे. आणि जर कलाकारांना जर घुसमट वाटू लागली तर मात्र समाजाची घुसमट व्हायला वेळ लागणार नाही.

आता दुसरी घटना.

दिनांक – ८ जानेवारी २०१७

स्थळ – बेवरली हिल्स, कॅलिफॉर्निया.

      सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. कारण अभिनेत्री, गायिका असलेल्या तिला लाइफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड घोषित झाला होता. काळ्या रंगाचा झगा घालून ती व्यासपीठावर चढू लागली. जणू कशाचा तरी निषेध करायचा तिने मनाशी ठरवले होते. बहुतेक श्रोत्यांसाठी तो एक नेहमीचाच पुरस्कार वितरण सोहळा होता पण ते तसे नव्हते. सुरवातीला थोडेसे हास्य पण नंतर शांतता. कारण ती बोलत होती. व्यक्त होत होती. कारण ती आपण कलाकार असल्याची जणू सिद्धच करत होती.

ती होती ज्येष्ठ अमेरिकन अभिनेत्री व गायिका मेरील स्ट्रिप.

          अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करून ती व्यक्त होत होती. एका अपंग पत्रकाराची केलेली नक्कल तिला अस्वस्थ करत होती. तिच्या या भाषणातील हा एकाच मुद्दा अधोरेखित केला गेला पण ती त्यापेक्षा अधिक बोलून गेली. हॉलीवूड म्हणजे काय ? याचे सर्वोत्तम विश्लेषण तिने केले. आणि अर्थातच अमेरिकेचे. अर्थातच संस्कृतीचे. जिचे ओझे अमेरिकन समाज घेत नाही. असा समाज ज्यामध्ये सांस्कृतिक बंडखोरी ही नेहमीचीच आहे. जर तुम्ही भाषण नीट ऐकले नसाल तर पुन्हा ऐका, पुन्हा पहा.

           पुतळा जाळणारे, काळे झेंडे दाखवणारे अस काही त्या भाषणानंतर झाल्याचे तिकडे त्या प्रदेशात झाल्याचे ऐकिवात नाही. ती बोलली एक संधी आहे. जगभरातील कलाकारांना. व्यक्त होण्याची. पण होतील का? नाही वाटत. कारण संस्कुती आड येते. कशाची संघटनांची, पक्षांची, धर्माची, जातीची आणि कशाकशाची. त्यांचा तरी काय दोष. कारण इतिहास सुध्दा सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक शिकवला जातो. पण माणुसकीच्या इतिहासाच्या पुस्तकाची पान अजूनही कोरीच आहेत. याचा अर्थ माणुसकी नव्हती असा होत नाही तर माणुसकीची नोंद घ्यावीशी वाटली नाही असा होतो. मेरील स्ट्रिप याचे भाषण म्हणजे असेच काही. कारण ट्रम्प यांच्यावरची टीका लक्षात ठेवली जाईल पण त्या अपंग पत्रकाराबद्दलची वाटलेली संवेदना नाही.

       आता भारतातील कलाकारांचे काय? भारतातही काही संवेदनशील कलाकार आहेत. पण त्यांनी आपल्या देशाच्या जुगाड प्रवृत्तीनुसार त्यांनीही आपल्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला. समाजकारणाचा. कारण जेव्हा समाजाची उन्नती होईल तेव्हा समाजच नवा इतिहास घडवेल माणुसकीचा.

उम्मीद पे दुनिया कायम है |

                                     
                                                        काका सोनार गणेश चित्र शाळा
 © All Rights Reserved.

Comments

  1. सर....एका...बाजूला कलाकार व्यक्त हितो.... तेव्हा... त्याला...जगभरातून वाहवाह मिळते..... आणि दुसऱ्या बाजूला (आपल्या देशात).... त्याच्या व्यक्त होण्यावर... निदर्शने होतात......म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र हे जे काही आहे ....ते शाळेत ....शिकवण्या पुरते....असे म्हणावे लागेल....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आता तुम्ही मोठे झालात ?

           दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक कुटुंबे शहरातून गावाकडे आली असतील. पण कोकणातील चाकरमानी दिवाळीत मुंबईतच थांबण पसंत करतात. कारण मे महिन्याची सुट्टी आणि गणेश चतुर्थीला त्यातले बहुतेक जण गावी येऊन गेलेले असतात. पण तुलसी विवाह (बारस) आणि देव दिवाळी निमित्त काहीजण गावी येतात. त्या पैकी एका कुटुंबाची ही गोष्ट.       गेल्या रविवारचा दिवस. दुपारचे तीन वाजले असतील. पलीकडच्या परसातून लहान मुलांचा ओरडण्याचा, खेळण्याचा आवाज येत होता. आवाजावरून अस वाटत होत की ती मुल प्लास्टिकच्या बॉलने खेळत होती. हसणारी, बागडणारी मुल ही भूतकाळाची आठवण करून देत होती. प्लास्टिक बॉलला आम्ही कवटी बॉल म्हणायचो. आम्हाला कडक कवटी बॉल आवडायचा. आणि जर तो पायाच्या हाडावर बसला तर होणारी वेदना म्हणजे अगदी डोक्यात जायची. आम्हाला त्या बॉलच्या आवाजाची गंमत वाटायची कारण तो आवाज बहुतेक कोणाला आवडायचा नाही. असाच काही त्या मुलाचं चालू होत. आवाजावरून ती दोन तीन मुल असावीत.       पण तेवढ्यात एक कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतला....

(ट्रिप्लिंग)..........रांगा, नोटा आणि आपण

         रांगा आपल्याला नेहमीच्याच. देवळात दर्शनाच्या रांगा, शाळेत शिस्तीसाठी रांगा, बससाठी रांगा, मुंग्यांच्या रांगा, रेल्वे तिकीट खिडकीवरच्या रांगा, रॉकेलसाठी रांगा, रेशनसाठी रांगा आणि बँकांमधील रांगा. पण ९ नोव्हेंबर पासून या रांगांना एक अर्थ प्राप्त झाला. रांगा या मानव हा सामाजिक प्राणी आहे यांची प्रचीती देऊ लागल्या. कारण कधीही रांगेत न राहणारे आता ५०० आणि १००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत दिसू लागले आहेत.          या रांगा एका रंगमंचाप्रमाणे वाटू लागल्या आहेत. रंगमंच ? हो रंगमंच. लोकांना व्यक्त होण्यासाठी रांगा मदत करतील याचा कोणी विचारदेखील केला नसेल. लोक रांगेमध्ये आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. कारण पैसा हा आपल्या जीवनात किती महत्वाची भूमिका बजावतो याचा अनुभव अनेकांना गेल्या आठवडाभरात आला असेलच. कारण खिशात पैसा असूनही कोणी विचारात नाही, ही भावनाच किती विचित्र आहे. कारण “पैसा बोलता है|” , पैसा फेंक तमाशा देख | किंवा दाम करी काम. असे डायलॉग आपण ऐकले असतीलच.     ...

चूक की बरोबर ?

                     गेल्या आठवड्यात अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदाचा मान मिळवला. पण आता अमेरिकेत त्यांच्या निवडीस होणारा विरोध पाहता याला मान म्हणावा की अपमान म्हणावा हा खरा प्रश्न आहे. अपमान कशाचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण अमेरिका या देशाला स्वतःची अशी काही एक संस्कृती नाही आहे, अमेरिका म्हणजे अमेरिकन, युरोपियन, आशियाई, लॅटिन आणि आफ्रिकन अशा अनेक संस्कृतीचे सुंदर मिलन आहे. आणि यासाठी महत्वाचे कारण म्हणजे मुक्त आणि खुल्या विचाराचे अमेरीकन्स.           पण जग गोल आहे. याचा प्रत्यय या अध्यक्षीय निवडणुकीतून आपणास आला असेल. संपूर्ण जगात कट्टरतावादाचा पुरस्कार वाढत चालला आहे. याचेच उदाहरण म्हणून आपणास आयसिसचा उदय. ब्रिटनचा युरोपिअन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय. (थोडक्यात ब्रेक्झिट.) जर्मनीत निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न, काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये होणारे भारतीयांवर...