गेल्या आठवड्यात अमेरिकेत झालेल्या
अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष
पदाचा मान मिळवला. पण आता अमेरिकेत त्यांच्या निवडीस होणारा विरोध पाहता याला मान म्हणावा
की अपमान म्हणावा हा खरा प्रश्न आहे. अपमान कशाचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण
अमेरिका या देशाला स्वतःची अशी काही एक संस्कृती नाही आहे, अमेरिका म्हणजे अमेरिकन,
युरोपियन, आशियाई, लॅटिन
आणि आफ्रिकन अशा अनेक संस्कृतीचे
सुंदर मिलन आहे. आणि यासाठी महत्वाचे कारण म्हणजे मुक्त आणि खुल्या विचाराचे
अमेरीकन्स.
पण जग गोल आहे. याचा प्रत्यय या
अध्यक्षीय निवडणुकीतून आपणास आला असेल. संपूर्ण जगात कट्टरतावादाचा पुरस्कार वाढत
चालला आहे. याचेच उदाहरण म्हणून आपणास आयसिसचा उदय. ब्रिटनचा युरोपिअन युनियनमधून
बाहेर पडण्याचा निर्णय. (थोडक्यात ब्रेक्झिट.) जर्मनीत निर्माण झालेला
निर्वासितांचा प्रश्न, काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया मध्ये होणारे भारतीयांवरील
हल्ले इ. अशी अनेक उदाहरणे आपणास घेता येतील. अमेरिकन ड्रीम्सच्या बाता
करणाऱ्यांना विशेषतः भारतीयांना या निवडणुकीचे विश्लेषण करणे अधिक आवश्यक आहे.
कारण राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्यासाठी ट्रम्पसाहेबांचा खटाटोप हा अमेरिकन
राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारास साजेसा नाही. अब्राहम लिंकनसारख्या व्यक्तीला
राष्ट्राध्यक्ष करणाऱ्या रिपब्लिकन पार्टीला असा उमेदवार शोभत नाही.
कट्टरता, तिरस्कार, मुस्लिमांबद्दलची
टोकाची भूमिका, स्त्रियांबद्दलच्या टिप्पणी, आउटसोर्सिंगला विरोध, परदेशी नागरिकांना
अमेरिकेत असणाऱ्या नोकऱ्यांना विरोध, फोर्ड कंपनीबद्दलचे विचार, अॅप्पलला दिलेला इशारा, पर्यावरण कशाशी खातात असा प्रश्न पडलेला, पुन्हा
गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय असा विचार समाजात पेरणारा राष्ट्राध्यक्ष मुक्त आणि
खुल्या विचाराच्या अमेरिकन नागरिकांना हवाहवासा वाटावा हे कशाचे प्रतीक आहे ? याचा
असा अर्थ होत नाही की मी काही डेमॉक्रेटिक
पक्षाचा समर्थक आहे. पण म्हणतात ना दगडापेक्षा वीट मऊ. कारण कोणाची बाजू घेण्याचा
प्रश्न नाही. जेव्हा आपल्यासमोर वाईट आणि अधिक वाईट असे पर्याय असतात तेव्हा आपण निर्णायक
मत देतो.
आणि आता आदर्श हे गुंडाळून ठेवावेत अशीच
परिस्थती जगात निर्माण होत आहे. आणि जागतिक राजकारणात अमेरिकेला यांची सवयच आहे.
कारण अमेरिकन आदर्श आणि मुल्ये ही गैर-अमेरिकनांसाठी लागू नसतात असा अमेरिकेचा
राजकीय विचार आहे. ( इतिहास गवाह है | ) कदाचित ओबामांकडून झालेला अपेक्षाभंग
किंवा नवीन ट्राय करूया म्हणून का असेना ट्रम्प पुढील चार वर्षे तरी अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष असतील. कारण लोकांना स्वतःमधील असंतोषाला वाट देणारे नेते हवे
आहेत, पण हे नेते बोलघेवडे ठरावेत हीच आशा. कारण जगात वाढणारा कट्टरवाद हा एका
येणाऱ्या वादळापुर्वीची शांतता असू नये हीच अपेक्षा. ट्रम्प यांच्या निवडीचा
निर्णय चूक की बरोबर हे काळच ठरवेल.
पण
मुक्त आणि खुल्या विचाराची अमेरिका ही काळाची गरज आहे कारण जागतिक राजकारणात
नव्याने महासत्ता होऊ पाहणाऱ्या चीनपेक्षा ट्रम्प महाशयांचा अमेरिका जगाला नक्कीच
परवडेल. कारण ट्रम्प यांना होणारा विरोध आणि त्याची बातमी आपणास कळाली हेच लोकशाही,
खुल्या आणि मुक्त विचारांचं उत्तम उदाहरण आहे. नाहीतर चीन............
काका सोनार गणेश चित्र शाळा
तुम्ही जो कट्टरपंथीय चा मुद्दा मांडला तो खरच भीषण आहे .....आणि येत्या काही वर्षात तो रुद्र रूप धारण करेल अशी चिन्हे आहेत .......लोकांनी वेळीच काळाची पावले ओळखावी.......आणि ट्रम्प सारखे बोलघेवद्याना आवर घालावा ........भारतात काही बोलघेवद्याची कमी नाही ..........
ReplyDeleteThanks for your reply !!!!
Delete